Skip to main content

Posts

Showing posts from November, 2020

Rotary Selfie with Rangoli Competition

हे नवे वर्ष आव्हानांनी भरलेले आहे. कोरोना संकटाची तीव्रता कमी झालेली असली तरीही संपूर्ण संकट टळलेले नाही. या संकटाच्या सोबतीने आपल्या सर्वांना पुढचा काळ व्यतीत करावा लागणार आहे हे सत्य स्वीकारुनच आपण वाटचाल करणे आवश्यक आहे.  गेले आठ महिने अत्यंत तणावाचे आणि संघर्षाचे होते. आपल्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला होता. प्रचंड उलथापालथी झाल्या. तो ताण अजूनही कायम आहे. चिंता आहेच. आणि त्या वातावरणात हा दीपोत्सव आला आहे. या दिवाळी सणाचा आनंद वाढविण्यासाठी रोटरी  डिस्ट्रिक ३१७० चे गव्हर्नर  रो.संग्राम पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी  रो.सौ. उत्कर्षा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरी  डिस्ट्रिक ३१७०,  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व रोटरी क्लब च्या सहकार्याने घेऊन येत आहे एक आनंददायी उपक्रम  " रोटरी सेल्फी विथ रांगोळी  स्पर्धा". स्पर्धेतील नियम व अटी १. स्पर्धकानी आपण स्वहस्ते काढलेल्या रांगोळीसह सेल्फी पाठविणे आवश्यक आहे.  २. ही स्पर्धा खुली असल्यामुळे या स्पर्धेमध्ये कुणीही सहभाग घेऊ  शकतात. ३. रांगोळी स्वहस्ते काढून त्यात रोटरी चा लोगो  अथवा रोटरी हा शब्द  येणे आवश्यक आहे.  ४. रांगोळ