Skip to main content

Rotary Selfie with Rangoli Competition

हे नवे वर्ष आव्हानांनी भरलेले आहे. कोरोना संकटाची तीव्रता कमी झालेली असली तरीही संपूर्ण संकट टळलेले नाही. या संकटाच्या सोबतीने आपल्या सर्वांना पुढचा काळ व्यतीत करावा लागणार आहे हे सत्य स्वीकारुनच आपण वाटचाल करणे आवश्यक आहे. 


गेले आठ महिने अत्यंत तणावाचे आणि संघर्षाचे होते. आपल्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला होता. प्रचंड उलथापालथी झाल्या. तो ताण अजूनही कायम आहे. चिंता आहेच. आणि त्या वातावरणात हा दीपोत्सव आला आहे. या दिवाळी सणाचा आनंद वाढविण्यासाठी रोटरी  डिस्ट्रिक ३१७० चे गव्हर्नर  रो.संग्राम पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी  रो.सौ. उत्कर्षा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरी  डिस्ट्रिक ३१७०,  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व रोटरी क्लब च्या सहकार्याने घेऊन येत आहे एक आनंददायी उपक्रम 


" रोटरी सेल्फी विथ रांगोळी  स्पर्धा".


स्पर्धेतील नियम व अटी


१. स्पर्धकानी आपण स्वहस्ते काढलेल्या रांगोळीसह सेल्फी पाठविणे आवश्यक आहे. 

२. ही स्पर्धा खुली असल्यामुळे या स्पर्धेमध्ये कुणीही सहभाग घेऊ  शकतात.

३. रांगोळी स्वहस्ते काढून त्यात रोटरी चा लोगो  अथवा रोटरी हा शब्द  येणे आवश्यक आहे. 

४. रांगोळी संस्कार भारती  प्रकारची असावी.

५. या स्पर्धेतील बक्षिसांचे स्वरूप  प्रथम क्रमांक -५०००,  द्वितीय क्रमांक -३००० ,  

    तृतीय क्रमांक  - २००० आणि प्रत्येकी  १००० रुपयांची दहा उत्तेजनार्थ पारितोषिके 

    देण्यात येणार आहेत. 

६. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश शुल्क आहे अवघे १०० रुपये.

७. सेल्फी मध्ये  स्वतःचा फोटो आणि रांगोळी ही स्पष्ट दिसणे आवश्यक आहे.

८. या स्पर्धेमध्ये आयोजकांचा निर्णय अंतिम राहील. 

९. 28 नोव्हेंबर 2020 पर्यंत खालील लिंक वर क्लिक करून आपला सहभाग नोंदवावा.

१०. विजेत्यांची नावे 25 डिसेंबर रोजी वृत्तपत्रांतून प्रसिद्ध दिली जातील. 

पेमेंट लिंक:

https://rzp.io/l/Ex34P7R

वरील नियम वाचा आणि पेमेंट लिंक वर क्लिक करून नोंदणी रक्कम रु. १०० जमा करा. ट्रांज़्यक्शन आय डी नोट करा.

ट्रांज़्यक्शन आय डी मिळाल्यानंतर खालिल लिंक वर क्लिक करुन ऑन लाईन अर्ज  भरा व सेल्फी विथ रांगोळी चा फोटो अपलोड करा.  

https://forms.gle/szqGGVgxRtKhoTWH9


तेव्हा आताच तयारीला लागा. सेल्फी विथ रांगोळी  स्पर्धेमध्ये सहभागी व्हा. दिवाळीचा आनंद द्विगुणीत करा.


संकटे माणसाला नवी नाहीत. कैक संकटांवर मात करून माणूस उभा आहे. संकटात एकमेकाला साथ देत आपण उभे तरलो. यापुढेही राहणार आहोत. 


या प्रकाशपर्वाच्या निमित्ताने सर्व चिंता झटकून टाकूया. कोरोनासुराचा वध करूया. उत्साहाची पणती प्रज्वलित करुया. चैतन्याची आरास करूया. नव्या उत्साहाने, नव्या उमेदीने, नव्या वर्षाला प्रारंभ करूया. रोटरीच्या या स्पर्धेत सहभागी होऊया. अधिक माहिती करता खालील व्यक्तींशी  संपर्क साधावा. 


कुडाळ - सचिन मदने  - ९४२१२३८७२३.

सावंतवाडी - डॉ. राजेश नवांगुळ - ९४२३०५३९९५ 

कणकवली - वर्षा बांदेकर - ७०५७८३७२९० 

मालवण - डॉ. लीना लिमये - ९४२२०७६८०५ 

वेंगुर्ले - गणेश  अंधारी ९४२३३४१८८८ 

शिरोडा - मधुसुदन उर्फ योगेश महाले  ७३५००७४७३७ 

तांत्रिक विभाग प्रमुख - प्रसन्ना मयेकर मालवण ९४२३५१२४५१ 

प्रकाशपर्वाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !


नवे वर्ष सुख, समृद्धी आणि भरभराटीचे जावो !!


आपले नम्र,


रोटरी  डिस्ट्रिक ३१७० चे प्रांतपाल  रो.संग्राम पाटील, रो.सौ. उत्कर्षा पाटील

इव्हेंट चेअरमन तथा  उपप्रांतपाल प्रणय तेली

उपप्रांतपाल सिताराम कुडतरकर

वेब मास्टर – प्रसन्ना मयेकर मालवण 

रोटरी क्लब कुडाळ अध्यक्ष  सचिन मदने

रोटरी क्लब सावंतवाडी अध्यक्ष राजेश  नवांगुळ

रोटरी क्लब कणकवली  अध्यक्ष लऊ पिळणकर

रोटरी क्लब मालवण  अध्यक्ष  महेंद्र गोवेकर

रोटरी क्लब वेंगुर्ले अध्यक्ष गणेश  अंधारी

रोटरी क्लब शिरोडा अध्यक्ष  मधुसुदन उर्फ योगेश महाले

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Rotary Magazine 2021-22 Darpan